येवता (पन्हाळवाडी) ता. केज:
मौजे येवता ता. केज, जि. बीड. येथील वैकुंठवासी ह.भ.प. पांडुरंग गुरुजी इनामदार यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा श्रावण शुद्ध २ म्हणजेच शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ ते शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ (श्रावण शुद्ध ९) या कालावधीत मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे.
सप्ताहाचा प्रारंभ टाळ-वीणा पूजनाने होणार असून हे पूजन ह.भ.प. मधुकर महाराज इनामदार यांच्या शुभहस्ते पार पडेल.
असा असेल दैनंदिन कीर्तन व हरिजागर कार्यक्रम:
सप्ताह काळात दररोज सायंकाळी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा व रात्री विविध भजनी मंडळांचा हरिजागर रंगणार आहे:
शुक्रवार, दि. १४/०८/२०२६:
कीर्तनकार: ह.भ.प. श्री. सिद्धांताचार्य विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे
हरिजागर: कोठी व येवता भजनी मंडळ
शनिवार, दि. १५/०८/२०२६:
कीर्तनकार: ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज काटकर (येवता)
हरिजागर: मोहन गिरवाडी भजनी मंडळ
रविवार, दि. १६/०८/२०२६:
कीर्तनकार: ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज शास्त्री (बार्शी)
हरिजागर: कोल्हेवाडी भजनी मंडळ
सोमवार, दि. १७/०८/२०२६:
कीर्तनकार: ह.भ.प. श्री. दिपक महाराज मेटे (लव्हूरी)
विशेष आकर्षण: नाना महाराज, पाटील ताई व सुवर्णा ताई यांचे ‘सोंगी भारुड’
हरिजागर: साखरे वस्ती भजनी मंडळ
मंगळवार, दि. १८/०८/२०२६:
कीर्तनकार: ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज इनामदार (विठ्ठल रुक्मिणी संस्थान, येवता)
हरिजागर: शिंदी भजनी मंडळ
बुधवार, दि. १९/०८/२०२६:
कीर्तनकार: ह.भ.प. श्री. गणेश महाराज जोगदंड (संत एकनाथ महाराज शांतीधाम)
हरिजागर: काशिदवाडी भजनी मंडळ
गुरुवार, दि. २०/०८/२०२६:
कीर्तनकार: ह.भ.प. श्री. महंत श्रीराम महाराज विडेकर (साधू शिवरामपुरी मठ संस्थान, विडा)
हरिजागर: येवता भजनी मंडळ
काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार सांगता:
शुक्रवार, दि. २१/०८/२०२६:
सप्ताहाची सांगता ह.भ.प. श्री. महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर (एम.ए. संस्कृत – मठाधिपती, वरपगाव) यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने होईल. हे कीर्तन सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत पार पडेल. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुणीजन साथसंगत:
मृदंगाचार्य: ह.भ.प. श्री. बाळासाहेब महाराज बसवर (अध्यक्ष: ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था), ह.भ.प. श्री. अशोक बापू डोंगरे
गायनाचार्य: ह.भ.प. श्री. रामहरी आबा काटकर, ह.भ.प. श्री. कल्याण आप्पा सक्राते
काकडा भजन: समस्त गावकरी मंडळी, येवता.(पन्हाळवाडी)
या सर्व धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचा परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवणसुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी,येवता पन्हाळवाडी (ता. केज, जि. बीड) यांच्या वतीने करण्यात आले आहे.












