जालना.प्रतिनीधी,(रामकिसनअवधूत): 
अंधश्रद्धा, अज्ञान आणि सामाजिक अन्यायाविरोधात आयुष्यभर लढा देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त जालना शहरात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. जयनगर येथील महाप्रजापती बौद्ध विहारात वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. दाभोळकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या वैज्ञानिक विवेकवादी दृष्टिकोनाला आणि सामाजिक कार्याला उजाळा दिला.
यावेळी बोलताना दीपक डोके म्हणाले, “विचार कधीही मरत नाहीत, तर ते येणाऱ्या पिढ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची खरी ताकद देतात. डॉ. दाभोळकरांनी दिलेला विवेकवादाचा संदेश आणि त्यांचे विचार समाजाच्या स्मरणात कायम जिवंत राहतील.”
या अभिवादन कार्यक्रमास भंते रेवत, राजेंद्र खरात, एम. व्ही. चौधरी, श्रीराम उघडे, सुकदेव बोर्डे, विलास दाभाडे, प्रशांत खंडागळे, किरण कोळी यांच्यासह लताबाई रनवीर, मालताबाई बोर्डे, नंदा साळवे, चंद्रकलाबाई बनकर, पंचशीला पारधे, कांताबाई म्हस्के, रंजना गाडगे, सीमा सदावर्ते, अलका डोके, अस्मिता डोके, शारदा कोळे आणि परिसरातील फुले-शाहू-आंबेडकरवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











