लाईव्ह अशोका टाईम्स / येवता प्रतिनिधी:
शिवसेना उपनेत्या संगीताताई ठोंबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, येवता येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. डॉ. प्रतिभा अशोक थोरात यांच्या वतीने या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेने, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभैय्या मुळूक आणि तालुकाप्रमुख अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत ये-जा करणे सोयीचे व्हावे या हेतूने हे सायकल वाटप करण्यात आले.
उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमास उपतालुकाप्रमुख सुग्रीव बसवर, डॉ. संतोष बुडूक, उपसरपंच बाळासाहेब सक्राते, जयचंद पाटील, अंकुश जोगदंड, अशोक सक्राते, रमेश जोगदंड, बाळासाहेब जोगदंड, प्रदीप काटकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्यामसुंदर काटकर, प्रदीप जोगदंड, भागवत जोगदंड, सुभाष जोगदंड, अमोल जोगदंड, भारत राठोड यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













