पोलिस प्रशासन न्यूज.

महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (MSF) मध्ये निवड! कुमारी दिक्षा हिवराळे हिचा श्रीरामपूर येथे ‘वंचित’सह विविध संघटनांकडून भव्य सत्कार


प्रतिनिधी /सुरेश वाघमारे:  श्रीरामपूर:               श्रीरामपूर येथील गायकवाड वस्तीची रहिवासी असलेल्या कुमारी दिक्षा सुरेश हिवराळे हिची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (MSF) मध्ये मुंबई येथे निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि विद्रोही मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तिचा भव्य सत्कार करण्यात आला. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आणि संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत खडतर परिश्रमाने दिक्षा हिवराळे हिने हे गौरवास्पद यश संपादन केले आहे. तिच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मान्यवरांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या. तिचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक गरजू तरुणांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.     मान्यवरांची उपस्थिती: या सत्कार समारंभास भारतीय बौद्ध महासभेचे मा. जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, बोर्डे साहेब, डॉ. सलिम शेख, वंचित बहुजन युवा आघाडीचे (जिल्हा महासचिव) सुनिल वाघमारे, ॲड. अमोल सोनवणे, राजेंद्र हिवाळे, संतोष त्रिभुवन, श्रीकांत मोरे, विजय जगताप, विलास अहिरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिक्षा हिवराळे हिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि तिच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर मिळालेले हे यश सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!