पोलिस प्रशासन न्यूज.

येवता(पन्हाळवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेने गाव दुमदुमणार


येवता ​(पन्हाळवाडी) ता. केज:

मौजे येवता ता. केज, जि. बीड. येथील वैकुंठवासी ह.भ.प. पांडुरंग गुरुजी इनामदार यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा श्रावण शुद्ध २ म्हणजेच शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ ते शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ (श्रावण शुद्ध ९) या कालावधीत मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे.

​सप्ताहाचा प्रारंभ टाळ-वीणा पूजनाने होणार असून हे पूजन ह.भ.प. मधुकर महाराज इनामदार यांच्या शुभहस्ते पार पडेल.

​असा असेल दैनंदिन कीर्तन व हरिजागर कार्यक्रम:

​सप्ताह काळात दररोज सायंकाळी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा व रात्री विविध भजनी मंडळांचा हरिजागर रंगणार आहे:

​शुक्रवार, दि. १४/०८/२०२६:

​कीर्तनकार: ह.भ.प. श्री. सिद्धांताचार्य विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे

​हरिजागर: कोठी व येवता भजनी मंडळ

​शनिवार, दि. १५/०८/२०२६:

​कीर्तनकार: ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज काटकर (येवता)

​हरिजागर: मोहन गिरवाडी भजनी मंडळ

​रविवार, दि. १६/०८/२०२६:

​कीर्तनकार: ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज शास्त्री (बार्शी)

​हरिजागर: कोल्हेवाडी भजनी मंडळ

​सोमवार, दि. १७/०८/२०२६:

​कीर्तनकार: ह.भ.प. श्री. दिपक महाराज मेटे (लव्हूरी)

​विशेष आकर्षण: नाना महाराज, पाटील ताई व सुवर्णा ताई यांचे ‘सोंगी भारुड’

​हरिजागर: साखरे वस्ती भजनी मंडळ

​मंगळवार, दि. १८/०८/२०२६:

​कीर्तनकार: ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज इनामदार (विठ्ठल रुक्मिणी संस्थान, येवता)

​हरिजागर: शिंदी भजनी मंडळ

​बुधवार, दि. १९/०८/२०२६:

​कीर्तनकार: ह.भ.प. श्री. गणेश महाराज जोगदंड (संत एकनाथ महाराज शांतीधाम)

​हरिजागर: काशिदवाडी भजनी मंडळ

​गुरुवार, दि. २०/०८/२०२६:

​कीर्तनकार: ह.भ.प. श्री. महंत श्रीराम महाराज विडेकर (साधू शिवरामपुरी मठ संस्थान, विडा)

​हरिजागर: येवता भजनी मंडळ

​काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार सांगता:

​शुक्रवार, दि. २१/०८/२०२६:

सप्ताहाची सांगता ह.भ.प. श्री. महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर (एम.ए. संस्कृत – मठाधिपती, वरपगाव) यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने होईल. हे कीर्तन सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत पार पडेल. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

​गुणीजन साथसंगत:

​मृदंगाचार्य: ह.भ.प. श्री. बाळासाहेब महाराज बसवर (अध्यक्ष: ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था), ह.भ.प. श्री. अशोक बापू डोंगरे

​गायनाचार्य: ह.भ.प. श्री. रामहरी आबा काटकर, ह.भ.प. श्री. कल्याण आप्पा सक्राते

​काकडा भजन: समस्त गावकरी मंडळी, येवता.(पन्हाळवाडी)

​या सर्व धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचा परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवणसुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी,येवता पन्हाळवाडी (ता. केज, जि. बीड) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!