केज/प्रतिनिधी : स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दि.१ फेबुवारी २०२६ रोजी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली रंगभरण स्पर्धा व संत रविदास जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सर्वप्रथम संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.यावेळी संत रविदास एक निस्सीम भक्त या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.
या परिसंवादात रामकृष्ण तात्या गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड, रमेश आबा गायकवाड, दादासाहेब गायकवाड यांनी विचार मांडले.
त्यानंतर विदयार्थी, विद्यार्थीनींसाठी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.रंगभरण स्पर्धेत प्रथम – सोहम श्रीराम गायकवाड,द्वितीय – यशवंत हनुमंत सौदागर, तृतीय -शिवम हनुमंत गायकवाड,तज्ञ परिक्षक म्हणून रविंद्र गायकवाड पेन्टर यांनी काम पाहिले. हे विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बॉलपेन बक्षीस म्हणून देण्यात आले.बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वितरण डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड, रविंद्र गायकवाड पेन्टर, रमेश आबा गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड, सुधीर गायकवाड,ज्ञानोबा ओव्हाळ,बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.या रंग भरण स्पर्धेत वेदिका गायकवाड,श्रद्धा गायकवाड,शिवराज जाधव,आर्यन गायकवाड, वेदिका गायकवाड,अक्षरा सौदागर,यशवंत सौदागर, सुशांत सौदागर,शिवम गायकवाड,सोहम गायकवाड,बालाजी टिंगरे,सोहम गायकवाड, अनुजा घोगले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
अध्यक्षीय समारोप डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.विदयार्थांनी विविध स्पर्धेला सामोरे जाऊन स्वतः ला सिद्ध करावे असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.तसेच संत रविदास यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. माणूसकी ही जात आणि मानवता हा धर्म त्यांनी आयुष्यभर सांगीतले तसे ते वागले अन जगले व समस्त जगताला तशी शिकवण दिल्याचे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र गायकवाड पेन्टर यांनी केले.तसेच सुत्रसंचालन बाबासाहेब गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन रामकृष्ण तात्या गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी,युवक, वाचक,जेष्ठ नागरीक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.














