केज ( प्रतिनिधी)-
क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानच्या वतीने 2026 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती व शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने क्रांतिसिंह पुरस्काराने विविध सामाजिक क्षेत्रामध्ये, चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात ये ते, या ही वर्षी महाराष्ट्राचे जेष्ठ नेते माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, माजी आमदार भाई बाळाराम पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष ॲड मान्सी मिलिंद,ॲड.नाना आवाड माजी भाई आमदार ज्ञानोबा गायकवाड, रणजितसिंह पाटील, राजसाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. असल्याची माहिती भाई मोहन गुंड यांनी दिली आहे
संपादक म्हणून प्रखडपणे अनेक वर्षापासुन लिखाणाच्या माध्यमातून भूमिका मांडणारे गमंत भाऊ भंडारी यांना पत्रकारिता क्षेत्रातील. सामाजिक राजकिय क्षेत्रातील कॉ. प्रकाश ( राजू ) देसले नाशिक, सांस्कृतिक क्षेत्रातील शाहीर तुकाराम ठोंबरे तांबवा, पर्यावरण क्षेत्रातील भाई संपत पवार पलुस, साहित्यिक क्षेत्रातील प्रा. मुकुंद राजपंखे आंबेजोगाई, प्रशासकीय क्षेत्रातील प्रा बाबासाहेब ठोंबरे परभणी, क्रिडा क्षेत्रातील कु स्वरुपा सुंदर नाईकवाडे केज आरोग्य क्षेत्रातील अनिता कांबळे केज , शैक्षणिक क्षेतातील मरणोत्तर कॉ बळवंत विठ्ठलराव कदम बीड यांना सन्मानित करण्यात येणार आहे. वेळ 3 ऑगस्ट सोमवार 12 वाजता मुक्ताई फंक्शन हॉल धारूर चौक, केज या ठिकाणी पुरस्कार सन्मान सोहळा होणार आहे ,अशी माहिती क्रांतिसिंह प्रतिष्ठाणचे तथा शेतकरी नेते भाई मोहन गुंड, भाई अशोक रोडे, भाई ॲड नारायण गोले, भाई बापूसाहेब साळके यांनी दिली आहे.












