गोरगरिबांच्या स्वप्नांवर पाणी,घरकुलचा निधी इतरत्र वळवला,सखोल चौकशी करावी – नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,हारुणभाई इनामदार यांची पत्रकार परिषदेत माहिती
केज/प्रतिनिधी
केज नगर पंचायतीने पंतप्रधान आवास योजनेत लाखोंचा महाघोटाळा झाला असून गोरगरिबांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे,घरकुल चा निधी बेकायदेशीरपणे इतरत्र वळवला असुन सखोल चौकशी करावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, हारुणभाई इनामदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘प्रत्येकाला हक्काचे घर’ हे स्वप्न केज नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले आहे. नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पंतप्रधान आवास योजनेतील तब्बल ३कोटी ६२ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे,सामान्यांचा आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाही या भ्रष्ट साखळीने सोडले नसल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमका प्रकार काय आहे ?
गोरगरीब जनतेच्या हक्काच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांनी दरोडा टाकला आहे.हा पैसा लाभार्थींपर्यंत पोहोचण्या ऐवजी अधिकार आणि पदाचा गैरवापर करून हडप करण्यात आला आहे.गोरगरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या प्रवृत्तीमुळे केज शहराचे नाव राज्यात खराब होत असून, लाभार्थ्यांमध्ये मोठे नैराश्य पसरले आहे.
पत्रकारांनाही बसला भ्रष्टाचाराचा फटका
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना देखील या भ्रष्ट कारभाराचा फटका बसला आहे.पत्रकार प्रकाश मुंडे आणि पत्रकार धनंजय कुलकर्णी यांना या भ्रष्टाचाराने थेट लक्ष्य केले आहे.पत्रकार प्रकाश एकनाथ मुंडे (लाभार्थी घर क्र.२२७) मुंडे हे या योजनेचे पात्र लाभार्थी असतानाही,केज नगर पंचायतीने त्यांचे हक्काचे सर्व हप्ते संगनमत करून गिळंकृत केले आहेत.एका पत्रकाराच्या हक्काच्या घरावर जर ही दरोडेखोरी होत असेल,तर सामान्य जनतेचे काय?असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधानांना ही लावला ‘चुना’!
भ्रष्टाचाराची ही सीमा इतकी ओलांडली गेली आहे की,देशाच्या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेलाच घरघर लागली आहे. “मोदी है तो मुमकिन है” असे म्हणत असताना, केजच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चक्क मोदी यांनाच दिवसाढवळ्या चुना लावून मोकळे झाले आहेत.
विद्यमान नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड व गटनेते हारुणभाई यांनी हा भ्रष्टाचार मागच्या लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी दि.२० मे २०१९ ते ३१ जानेवारी २०२२या कालावधीत संगनमताने झाला असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.
सत्ताधारी आणि प्रशासन सुस्त
इतका मोठा घोटाळा उघडकीस येऊनही नगर पंचायतीचे सत्ताधारी आणि वरिष्ठ अधिकारी हात झटकून मोकळे होत आहेत.या गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतंय? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.













