अहमदनगर | प्रतिनिधी (सुनिल वाघमारे)
श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल लक्ष्मी नारायण पॅलेसचे मालक आकाश शेखर दुबैय्या यांची त्यांच्याच हॉटेलमध्ये झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गाने सलग चार ते पाच दिवस श्रीरामपूर बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला तसेच शहरातील वाढत्या गुंडगिरीवर कठोर कारवाई करून श्रीरामपूर दहशतमुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली असून.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दूरध्वनीवरून दुबैय्या परिवाराशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले व कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी, “या दुःखद प्रसंगी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी उभी आहे. अन्यायाविरुद्धच्या लढ्यात आपण एकटे नाही. न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष आवश्यक ते सर्व सहकार्य करेल,” अशी ग्वाही दिली. श्रद्धेय साहेबांच्या या शब्दांनी दुबैय्या परिवाराला मोठा मानसिक आधार मिळाला.
राज्य प्रवक्त्या मा. उत्कर्षाताई रुपवते यांच्या समवेत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हामहासचिव मा. सुनिल वाघमारे, तालुकाध्यक्ष मा. डॉ. गौतम चित्ते, ख्रिस्ती विकास परिषदेचे मा. दिपक कदम, संजय महाले तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुबैय्या परिवाराची, प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचवेळी रुपवतेताई यांनी साहेबांशी बोलणे करून दिले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही, “अक्षय दुबैय्या यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि अन्यायाविरुद्धच्या प्रत्येक लढ्यात वंचित बहुजन आघाडी दुबैय्या परिवारासोबत ठामपणे उभी राहील,” असा विश्वास व्यक्त केला.












