पोलिस प्रशासन न्यूज.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी शेवगाव वंचित बहुजन आघाडीच्या गावप्रमुखांची बैठक संपन्न: ​प्रा. किसन चव्हाण


शेवगाव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी (VBA) शेवगाव तालुक्यात सक्रिय झाली असून, शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी तालुक्यातील गावप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शेवगाव येथील बंधन लॉन्स येथे झालेल्या या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख होते.या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव भागवत, तालुका युवक अध्यक्ष ऑगस्टीन गजभिव यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुनील खंडागळे, अरुण झांबरे, संतोष ढाकणे, बाप्पासाहेब उल्हारे, सरपंच अशोक गायकवाड, सरपंच विठ्ठल जगदाळे, ज्ञानेश्वर म्हस्के, सागर गरुड, रोहिणीताई ठोंबे, दिगंबर बल्लाळ, सुरेश खंडागळे, सुंदर आल्हाट, भारत मिसाळ, बाळासाहेब काळपुंड, गणेश पंडित, अशोक लोंढे, देवदान कांबळे, सुनील साळवे, अरुण खर्चन, लक्ष्मण मोरे, सलीम जिलानी, रवींद्र निळ, महादेव जगधने, एकनाथ जगधने, नारायण सातपुते, बाळासाहेब लहासे, संतोष गरड, रामभाऊ गुंजाळ आणि अनिकेत गोसावी यांचा समावेश होता.​मोर्चेसाठी आवाहन यावेळी प्रा. किसन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले आणि पक्ष संघटनेला मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी जनतेच्या मागण्यांसाठी संघर्ष तीव्र करण्याची सूचना केली. त्यानुसार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या मोर्च्यामध्ये ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा, प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि अतिक्रमणे कायम करावी यासह अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे आवाहन प्रा. चव्हाण यांनी यावेळी केले.


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!