पोलिस प्रशासन न्यूज.

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी – शरद मगर


बीड : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड येथे तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण विभागाकडे सादर करून प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

मुप्टाच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सध्या असलेली ३० विद्यार्थ्यांची बॅच रद्द करून पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची बॅच कायम ठेवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, निवडश्रेणी फरक तसेच सातवा वेतन आयोग फरक यांचा समावेश आहे.

शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या प्रलंबित संचिका तात्काळ मंजूर कराव्यात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडीच्या शिफारस प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा, जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समायोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

सन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांची बंद करण्यात आलेली जीपीएफ खाती पूर्ववत करून नियमित कपात सुरू करावी. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पाचवा हप्ता रोखीने द्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पर्यंतची जीपीएफ खाते स्लिप वितरित करून जीपीएफ खाती ऑनलाइन करण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

याशिवाय प्रचलित अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.

 

यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर आणि जिल्हासचिव शशिकांत जावळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी

ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, माध्यमिक विभाग जिल्हा सचिव प्राचार्य श्री श्रीकांत वारभुवन, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे ,प्रवीणकुमार डावरे

उपप्राचार्य चांगण एन एस,

प्रा संजय काकडे ,शेख मसूर अन्वर, अमित वाघमारे, राऊत अमोल, लेंडाळ एसडी ,घोडके ए एस ,घायाळ एचबी ,काझी एम एस आर ,पवार बी बी, चौधरी के एम ,पाटील बी पी गुरव जी एच, सोळंके जे ए हावळे आर एन ,चौरे डी पी ,

कुटे एस टी ,राठोड पी एम,

डोंगरे आर आर ,खटाने बी आर, जरे ए बी ,राऊत एस एस ,जगताप यु एस ,जोगदंड डी पी, मुंडे एन एस ,मोरे सुनील ,वीर एस बी,जाधव के जी,डोंगरे एस डी,शिरसट व्ही ए ,बिक्कड डी आर,काळे पी आर ,तांदळे एल आर,पोकळे डीबी ,शेळके जे ,कंधारे आर एस ,सवासे ए आर ,गवते एन के ,जरांगे डी एस ,सावंत बी व्ही,पठाण एस एन,गचांडे एस ए ,शिंदे डी एस,आदी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!