अहमदनगर प्रतिनिधी – (सुनिल वाघमारे )
ता. नेवासा | २६ ऑगस्ट : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय, ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष मा. राजेंद्र पातोडे साहेब यांच्या आदेशानुसार दहीगाव रोड, कुकाणा येथे वंचित बहुजन युवा आघाडीची आढावा बैठक तसेच कार्यकर्त्यांशी हितगुज कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेक तरुणांनी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेसोबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार केला.
सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष मा. प्रवीणभाऊ आल्हाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हामहासचिव मा. सुनिलभाऊ वाघमारे साहेब होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष मा. योगेशभाऊ गायकवाड, तालुकाध्यक्ष मा. आकाशदादा इंगळे तसेच नेवासा तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका महासचिव मा. गणपतराव मोरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार नेवासा तालुका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात जिल्हामहासचिव मा. सुनिलभाऊ वाघमारे साहेब यांनी तरुणांना परिवर्तनाच्या लढ्यात सक्रिय होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “या देशाचे परिवर्तन घडविण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. त्यासाठी तरुणांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे आणि संघटितपणे काम करणे गरजेचे आहे. सर्व जाती-धर्मातील युवकांना एकत्र घेऊन संविधानिक मूल्यांच्या आधारावर समाजाची आणि देशाची वाटचाल मजबूत करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.”
पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की, “भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने काम केले पाहिजे. ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा सर्व स्तरांवर वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. परिवर्तनाच्या या लढ्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीने उभे राहून श्रद्धेय साहेबांच्या नेतृत्वाला बळ देण्याचे काम करावे.”
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष मा. प्रवीणभाऊ आल्हाट म्हणाले की, “देशाची खरी ताकद ही युवा पिढी आहे. त्यामुळे तरुणांनी राजकारणाकडे कानाडोळा न करता देशाच्या सामाजिक व राजकीय परिवर्तनामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
तालुका उपाध्यक्ष धर्मा साळवे, तालुका उपाध्यक्ष अलीमभाई शेख, तालुका प्रसिद्धीप्रमुख निखिल काकडे, संघटक नितीन गोरडे, सचिन गोरडे, संदेश गोरडे, दत्तूभाऊ शेटे, अनिल वंजारी, सुजित गोरडे, अशोक निरपगार, रमेश इंगळे, रोहन खर्चन, बहादुर खान पठाण, राजूभाऊ गायकवाड, दीपकभाऊ चाबुकस्वार, श्याम शिरसाट, राहुल ठोंबरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी तालुकाध्यक्ष मा. आकाश इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह यामुळे कुकाणा येथील आढावा बैठक संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली.











