पोलिस प्रशासन न्यूज.

भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिन सोहळा १ फेब्रुवारीला.


हैदराबाद (प्रतिनिधी) :- साहित्य, संस्कृती व सामाजिक जाणीवांचा वारसा जपणाऱ्या भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगम या संस्थेचा २३ वा स्थापना दिन सोहळा रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्थळ Gnosis Vaidya Vidhya Prabodhini, मेट्रो पिलर क्र. १५५५, पोचम्मा टेंपल लेन, चैतन्यपुरी, दिलसुखनगर, हैदराबाद असे आहे. सन २००३ मध्ये वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या २३ वर्षांत साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध काव्यसंमेलने, साहित्यिक कार्यक्रम, स्पर्धा व समाजप्रबोधन उपक्रमांद्वारे संस्थेने अनेक नवोदित व प्रगल्भ साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्री रोहित चेबरोलू (Centre Head Academic Operation, HOD Physics) उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘साप्ताहिक महिमा खादीचा’चे मुख्य संपादक श्री गजानन गंगाधरराव बिडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून संस्थापक-अध्यक्ष श्री रविंद्रनाथसिंह चौहान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष उदयकुमार नाईक व उपाध्यक्ष नंदकुमार बैजवाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जयेशकुमार महेन्द्रा, मिलिन्द पाठक, तुम्मा जनार्दन, राघवेंद्रराव देशपांडे, लता संघी आदी सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. स्थापना दिनानिमित्त साहित्यप्रेमी, कवी, लेखक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!