पोलिस प्रशासन न्यूज.

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

वडवणी (प्रतिनिधी / लाईव्ह अशोका टाईम्स):

वडवणी तालुक्यातील गायरान जमिनीवर दीर्घकाळापासून प्रत्यक्ष शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिहीन व अनुसूचित जातीतील गायरानधारकांच्या शेती आणि उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गायरानधारकांना बेदखल न करता त्यांच्या ताब्याची व दाव्यांची कायदेशीर चौकशी करावी, अशी आग्रही मागणी वडवणी महिला तालुकाध्यक्ष सागरताई इचके यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

​प्रकल्पांना तीव्र विरोध व मागण्या:

तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे उपळी येथील प्रस्तावित १८ के.व्ही. महावितरण प्रकल्प आणि मौजे पुसरा येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी ठाम भूमिका गायरानधारकांनी घेतली आहे.

​वडवणी तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक भूमिहीन आणि अनुसूचित जातीतील कुटुंबे सन १९८१ पासून किंवा त्यापूर्वीपासून गायरान जमिनींवर प्रत्यक्ष शेती कसत आहेत. ही शेती त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने त्यांना कोणताही धक्का न लावता दिलासा द्यावा, तसेच त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!