पोलिस प्रशासन न्यूज.

केज पोलिसांची धडक कारवाई: विविध गुन्ह्यांत हवा असलेला सराईत फरार गुन्हेगार विशाल ऊर्फ ममड्या काळे जेरबंद!


केज:

विविध पोलीस ठाण्यांत चोरीच्या गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आणि पोलिसांना गुंगारा देणारा सराईत फरार गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. केज पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील कन्हेरवाडी येथे सापळा रचून पाठलाग करत या सराईताला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.

​गोपनीय माहितीवरून कारवाई

केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना रविवार, २० सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली की, केजसह विविध पोलीस ठाण्यांत चोरीच्या गुन्ह्यांत हवा असलेला फरार सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ ममड्या बालाजी काळे (रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) हा आपल्या घरी आलेला असून तिथेच थांबलेला आहे. या माहितीची तत्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हेरवाडीच्या दिशेने रवाना झाले.

​पाठलाग करून आवळल्या मुसक्या

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच पोलिसांची चाहूल लागून आरोपीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून रविवार, २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या सुमारास मोठ्या शिताफीने त्याला कन्हेरवाडी येथून ताब्यात घेत जेरबंद केले.

​अनेक गुन्ह्यांत होता पोलिसांना हवा

पकडण्यात आलेल्या आरोपीवर विविध ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद असून तो खालील प्रकरणांमध्ये पाहिजे होता:

​साईराम भास्कर अंडील (महावितरण शाखा अभियंता, केज) यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्हा.

​महादेव बाबुराव इंगळे (रा. शिवाजीनगर, कळंब रोड, केज).

​बालासाहेब कुंडलीक गायकवाड (रा. मस्साजोग, ता. केज).

​शितल वाजेद अली सय्यद (महावितरण शाखा अभियंता).

​अभिजीत रतन साखरे (रा. आवसगाव, ता. केज).

​अमोल गंगाराम चव्हाण (स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव) यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यांत हा आरोपी पोलिसांना हवा होता.

​या पोलीस पथकाने केली कामगिरी

सदर धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, जमादार बाळासाहेब अहंकांरे, नितीन वारे, राहुल तरकसे आणि दादाराव देवगुडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून मोठे कौतुक होत आहे.


गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!