केज/लाईव्ह अशोका टाईम्स,प्रतिनिधी:साबला ता.केज येथील ग्रामपंचायत आदर्श सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावात शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या उपक्रमा अंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेवाटप करण्यात येणार असून,शिक्षणा बाबत जनजागृती करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट साधन केंद्र केज येथील गटशिक्षणाधिकारी श्री. सुनीलजी केंदे हे राहणार आहेत.कार्यक्रमास विविध क्षेत्रातीलमान्यवर,पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सौ.जनाबाई काकडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारा हा उपक्रम ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरत आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, साबला ता.केज यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी व पालकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













