बीड/लाईव्ह अशोका टाईम्स ,प्रतिनिधी:अंबाजोगाई येथील दिव्यांग मुला मुलींची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खिंडकर यशराज हरिश्चंद्र या दिव्यांग विद्यार्थ्याने गोळा फेक व 100मी धावणे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे या वेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती प्रिया राणी पाटील व वै. स.का. नखाते यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तांदळे व क्रीडाशिक्षक फारुकी उपस्थित होते तसेच शाळेवरही हरिओम शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श मतिमंद निवासी विद्यालयाचे अध्यक्ष व सचिव आमचे मार्गदर्शक आदिनाथ सुर्वे साहेब व विजयकुमार सुर्वे साहेब यांच्या हस्ते विद्यार्थी यांचा व कलाशिक्षक फारूकी मुख्याध्यापक सुरेश तांदळे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Views: 65











