मुंबई/बीड : रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती मा.आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मा. आनंदराज आंबेडकर, मनीषाताई आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष सुशिल सूर्यवंशी, भूषण लोळगे तसेच लक्ष्मण गव्हाणे यांच्या हस्ते पुरुषोत्तम वीर यांना पुष्पहार, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास राज्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आनंदराज आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला.
Views: 6













