पोलिस प्रशासन न्यूज.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ केजमध्ये सामाजिक संघटनांचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन सादर


केज | प्रतिनिधी

दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी केज तालुक्यात विविध सामाजिक, राजकीय व पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन सादर केले. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे (शे.का.प.) राज्य चिटणीस भाई मोहण गुंड यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

देशभरात विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या घटनांविरोधात आवाज उठविणे ही काळाची गरज असल्याची भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली. दिल्लीतील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करावे तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी केज तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, नागरिक, युवा कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तहसील कार्यालयासमोर एकत्र येऊन आंदोलकांनी निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व केंद्र शासनाकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

उपस्थितांनी सांगितले की, देशातील विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा आंदोलनांवर बलप्रयोग अथवा दडपशाहीची भूमिका स्वीकारणे लोकशाहीसाठी घातक असून, सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याची भूमिका घ्यावी.

या प्रसंगी शे.का.प.चे राज्य चिटणीस भाई मोहण गुंड यांच्यासह केज तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले.

लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज

“सत्याचा आवाज, जनतेची ताकद”


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!