केज/प्रतिनिधी : केज तालुक्यातील केकतसारणी येथील बहुचर्चित महादेव मंदिराचा निकाल ग्रामपंचायतच्या बाजुने लागला आहे.केज न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की,केज दिवाणी न्यायालयात
दिवाणी दावा क्रमांक १५८/२०२५नानाभाऊ विरुद्ध ग्रामपंचायत केकतसारणी दावा दाखल केला होता. सदरील प्रकरणात नानाभाऊ सोनाजी भोईटे यांनी ग्रामपंचायत केकतसारणी यांच्या विरुद्ध गावठाणच्या जागेवर महादेव मंदिर बांधू नये म्हणून दावा दिला होता व मनाई हुकूमचा अर्ज दिला होता व केकतसारणी ग्राम पंचायतला प्रतिवादी केले होते.सदरील प्रकरणात प्रतिवादी कडुन दावा दाखल करून मनाई हुकुम अर्ज दाखल केला होता.दिवाणी व फौजदारी न्यायाधीश कुलकर्णी मॅडम यांच्या न्यायालयासमोर प्रकरण चालले व प्रकरणातील दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून सदरील प्रकरणात वादी यांचा मनाई हुकूमाचा अर्ज खारीज करण्यात आला प्रति दाव्यातील प्रतिवादींचा अर्ज मंजूर करण्यात आला.त्यामुळे महादेव मंदिर बांधकामा साठीचा मार्ग मोकळा झाला आहे.सदरील प्रकरणात जेष्ठ विधीज्ञ एम.एस लाड,ए.एल. लाड,एस.एस.भांगे, जे.जी.बारगजे यांनी कामकाज पाहिले. निकाल आल्यानंतर ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने विधीज्ञ मंडळीचा शाल,श्रीफळ,पुष्पहार व बुके देऊन सत्कार करण्यात आला.या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.












