येवता प्रतिनिधी:
येवता ता.केज येथे श्री क्षेत्र सोनारीच्या काळभैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने भव्य ‘सोनारी पायी दिंडी सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात ८ एप्रिल २०२६ रोजी होत असून, १२ एप्रिल २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक म्हणून रमेश अरुण पुराजी हे काम पाहत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी श्री. जालिंदर गायकवाड (मस्साजोग), श्री. महादेव जाधव (नांदूर- ज्ञानेश्वर वस्ती), श्री. गिरवली (इट- सकाळी नाश्ता), श्री. अर्जुन माने (वडाचीवाडी) आणि श्री. अभिमान नाकिंदे (पाटसांगवी) हे विशेष परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा:
दिंडी सोहळा ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होईल. तसेच, २१ एप्रिल २०२६ रोजी विशेष कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भाविकांना आवाहन:
या दिंडी सोहळ्यादरम्यान भाविकांनी महाप्रसाद आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.आश्रुबा राऊत,श्री.सुदाम खराडे,श्रीराम वायकर, वसुदेव राऊत या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.












