केज.प्रतिनिधीः-बीड जिल्ह्यातील शेतकरीवर्गात आपलीसी झालेली कृष्णा अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि. केज या बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी महत्वाचे पाऊल उचलले आसून बँकेच्या ऑनलाईन मोबाईल बँकिंग, फोन पे, गुगल पे सुविधेचा शुभारंभ व २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या शुभहस्ते रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान सामाजिक सभागृह केज बीड रोड बरड येथे गुरुवार दिनांक-१३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० वा. होणार आहे. तरी सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांनी तीस वर्षांपूर्वी कृष्णा अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेची केज येथे स्थापना केली. या कार्यकाळात बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे व रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणचे सचिव अतुल मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील आल्पवधितच ग्रामीण भागातील व्यावसायिक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांना आपलीसी झालेली कृष्णा अर्बन बँकचा ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन मोबाईल बँकीग सेवेचा लोकार्पण सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला ग्राहक, सभासद, व हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
मार्गदर्शनाखाली बँकेने यशस्वी वाटचाल करत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. बँकेच्या बीड, माजलगाव, कळंब, नांदूर घाट, शिरूर कासार शहरात शाखा कार्यरत आहेत. कृष्णा अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकने ग्राहकांच्या सेवेसाठी महत्वाचे पाऊल उचलले आसून ऑनलाईन मोबाईल बँकिंग, फोन पे, गुगल पे सूविधा गुरुवार पासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत होणार आहे. ऑनलाईन मोबाईल बँकिंग, फोन पे, गुगल पे सुविधेचा शुभारंभ व २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुडे यांच्या अध्यक्षतेखाली तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश (आप्पा) कराड व केज विधानसभा मतदारसंघ संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व संत महंतासह दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.












