पोलिस प्रशासन न्यूज.

केज येथे मानवी हक्क अभियानाची भव्य बैठक संघटन विस्तारासाठी मोठा निर्णय,नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण


केज/प्रतिनिधी

केज येथील शासकीय विश्रामगृह केज येथे मानवी हक्क अभियान संघटनेची एक महत्त्वपूर्ण व भव्य बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीत संघटनेच्या बळकटी करणा सोबतच आगामी काळातील विस्तार धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे,या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

बैठकीत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केज तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.उमेश भाऊ आव्हाड यांची केज तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच महादेव भाऊ जोगदंड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय ॲड. सोनवणे साहेब यांची वकील संघाचे सल्लागार म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली,ज्यामुळे संघटनेला कायदेशीर बाबींमध्ये अधिक बळ मिळणार आहे.ही बैठक प्रा.डॉ.मिलिंद नाना आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.त्यांच्या मार्गदर्शना मुळे संघटनेच्या कार्याला दिशा मिळाली.तसेच बीड जिल्हा अध्यक्ष विष्णू बप्पा मुजमुले यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ उमाप,युवक जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब भाऊ मुजमुले,ज्येष्ठ नेते कल्याण भाऊ ताकतोडे, परमेश्वर भाऊ आडागळे, धारूर तालुका अध्यक्ष किसन भाऊ लोखंडे, आर.पी.आय चे केज तालुका कार्याध्यक्ष ईश्वर सोनवणे,धारूर शहराध्यक्ष पवन भैय्या डोईफोडे,युवा नेते बंडू नाना मुजमुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.त्यांच्या उपस्थिती मुळे बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले.तसेच मिट्टू पारवे,महादेवलांडगे, सचिन गालफाडे,पांडुरंग कसबे,दिलीप जाधव, नितीन लांडगे,लक्ष्मण हजारे,धनंजय पारवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.तरुण कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद हे या बैठकीचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

बैठकी दरम्यान वक्त्यांनी मानवी हक्कांच्या रक्षणासाठी संघटनेचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. समाजातील दुर्बल, वंचित आणिअन्यायग्रस्त घटकांसाठी न्याय मिळवून देणे ही संघटनेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “संघटनेचा विस्तार गावागावांत करून सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,”असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या बैठकीत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या शेवटी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.या बैठकीमुळे मानवी हक्क अभियान संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळाली असून भविष्यात संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल,अशी आशा व्यक्त होत आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!