पोलिस प्रशासन न्यूज.

बलीप्रतिपदा: श्रीरामपूर शहरात सम्राट बळीराजाच्या स्मरणार्थ भव्य मिरवणूक


श्रीरामपूर: महान आशा आणि न्यायप्रियतेचे प्रतीक असलेल्या सम्राट बळीराजाच्या स्मरणार्थ, बलिप्रतिपदेच्या निमित्ताने (२२ ऑक्टोबर) श्रीरामपूर शहरात भव्य मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.बलीप्रतिपदेचा दिवस हा बळीराजाच्या स्मरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.यानिमित्ताने २२ ऑक्टोबर रोजी शहरात उत्साहाचे वातावरण होते. मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून झाली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांनी शहर दणाणून गेले होते. सम्राट बळीराजाच्या गौरवी घोषणा देत, बैलगाडीच्या सहाय्याने ही भव्य मिरवणूक मुख्य रस्त्यावरून आझाद मैदानापर्यंत काढण्यात आली.आझाद मैदान येथे मिरवणुकीचा समारोप अभिवादन सभेद्वारे करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

​भारतीय कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे

​विद्रोही सांस्कृतिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवे

​भाकप माले संघटनेचे नेते जीवन सुरडे

​दत्तनगरचे माजी सरपंच पी. एस. निकमसर

​स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले

​संभाजी ब्रिगेडचे डॉ. अरविंद बडाख

​शेतकरी संघटनेचे सुरेश टाके

​विद्रोही संघटनेचे डॉ. सलीम शेख

​आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे ज्ञानेश्वर भंगड

​या मान्यवरांनी आपल्या भाषणातून बळीराजाच्या आदर्श विचारांवर प्रकाश टाकला. याशिवाय वं.ब.यु.आ.चे जिल्हा महासचिव सुनिल वाघमारे, ॲड. राजेश बोर्डे, ॲड. अमोल सोनवणे, सुधाकर बागुल, फ्रान्सिस शेळके, अनिल गायकवाड यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.श्रीरामपूरकरांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन सम्राट बळीराजाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!