पोलिस प्रशासन न्यूज.

“परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणारच!” : RSS कार्यालयावर मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम; अमित भुईगळ


संभाजीनगर(औरंगाबाद): पोलिसांकडून ‘नागरिक सुरक्षा संहिता’ अंतर्गत नोटीस , वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जन आक्रोश मोर्च्या’ला क्रांतीचौक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. क्रांतीचौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) कार्यालय, औरंगाबाद, असा हा मोर्चा काढण्यात येणार होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात येणार होता. या मोर्चासाठी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस ठाण्यात विनंती अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, मोर्चा दरम्यान किंवा मोर्चानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी परवानगी फेटाळली आहे.                                                                        नेते अमित भुईगळ ठाम: या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ यांनी स्पष्ट केले आहे की, “पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, कोणत्याही परिस्थितीत मोर्चा हा निघणारच. परवानगी मिळो अथवा न मिळो, हा मोर्चा निघेल.  “​दरम्यान, पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडी व संबंधित पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावली आहे.                                                          आणि संबंधितांना पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


58
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!