पोलिस प्रशासन न्यूज.

अंबाजोगाई नर्सिंग कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान; शिष्यवृत्तीतही गैरप्रकार!


बीड/अंबाजोगाई: विद्यार्थी नेत्याकडून जिल्हाधिकारी,पोलीस अधिककांकडे तक्रार ,दीप्ती अहिरे नर्सिंग कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राच्या वर देवी-देवतांचे फोटो लावून त्यांच्या विचारांचा अपमान करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याशिवाय, कॉलेज प्रशासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम हडप केली जात असल्याचा आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.​सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याचे पुणे जिल्हा निरीक्षक इंजि. अक्षय गोटेगावकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, त्यांनी बीड जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष मा. शैलेश भाऊ कांबळे यांनाही पत्राद्वारे माहिती दिली आहे. छायाचित्र व्यवस्थेवरून वाद.कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरील प्राचार्य कक्षात बाबासाहेबांच्या छायाचित्राच्या वर देवी-देवतांचे फोटो लावलेले असल्याचे गोटेगावकर यांनी निदर्शनास आणले. बाबासाहेबांनी देवी-देवता नाकारून बौद्ध धम्माचा विज्ञानवादी मार्ग दाखवला असल्याने, हा प्रकार त्यांच्या विचारांचा अवमान करणारा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्राचार्य सूर्यवंशी यांना विचारणा केली असता, त्यांनी उद्धट भाषा वापरत “फोटो कुठे लावायचे हे आम्ही ठरवू” असे उत्तर दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.​शिष्यवृत्ती गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांचे शोषण ​या गंभीर आरोपांसोबतच कॉलेज प्रशासनावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम हडप करण्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज फी भरण्यासाठी शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम वापरण्यास भाग पाडले जात आहे, ज्यामुळे शासनाकडून मिळणारी रक्कम कॉलेज प्रशासनाकडून हडपली जात असल्याची शंका आहे.​शिवाय, विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक प्रॅक्टिकलमध्ये नापास केले जाते. शिष्यवृत्ती वेळेवर जमा न होणे, कागदपत्रे जाणीवपूर्वक अडवणे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेत विलंब करणे यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि शैक्षणिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.​माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. अक्षय गोटेगावकर यांनी मागणी केली आहे की, प्राचार्य कक्षातील छायाचित्र व्यवस्था तातडीने सुधारली जावी, शिष्यवृत्तीचा योग्य विनियोग आणि पारदर्शकता सुनिश्चित करावी आणि गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


58
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!