पोलिस प्रशासन न्यूज.

राहाता तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा महिला मेळावा उत्साहात; शेकडो महिलांचा पक्षप्रवेश


अ.नगर १६ मार्च:

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राहाता तालुक्यात महिला मेळावा, मार्गदर्शन शिबीर आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तालुक्यातील शेकडो महिलांनी याप्रसंगी पक्षप्रवेश केला.

हा मेळावा राज्य प्रवक्त्या मा. उत्कर्षाताई रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, “महिलांनी केवळ सामाजिक प्रश्नांवरच नव्हे, तर राजकारणातही सक्रिय सहभाग नोंदवणे काळाची गरज आहे.” संघटनात्मक बांधणी आणि महिलांच्या समस्यांवर त्यांनी यावेळी विशेष भाष्य केले.

भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा संघटक मा. विशाखाताई निळे यांनी महिलांना धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील विविध गावांतील शेकडो महिलांनी पक्षाचे सक्रिय सदस्यत्व स्वीकारले. यावेळी महिलांची ऑनलाईन सदस्य नोंदणी करून त्यांना तात्काळ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे राहाता तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभाताई निकम यांनी खूप मेहनत व यशस्वी प्रयत्न केले. तसेच कावेरीताई आल्हाट, वनिताताई जगताप, अनिताताई शेजवळ, मीनाक्षीताई निकाळे, पुष्पाताई शिरसाठ, अर्चनाताई धिवर आणि सुरेखाताई ठोंबरे यांचेही प्रयत्न प्रकाशझोतात आले.

युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीणभाऊ आल्हाट आणि महासचिव सुनील वाघमारे यांच्या नियोजनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन निकम आणि राहुल ठोंबरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणभाऊ आल्हाट यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनील वाघमारे यांनी मानले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मेळावा मैलाचा दगड ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!