पोलिस प्रशासन न्यूज.

हरेगाव मतमाऊली यात्रेत वंचित बहुजन युवाआघाडीचा सामाजिक उपक्रम


खिचडी, बिस्कीट व पाणी वाटप; ऑनलाइन सदस्य नोंदणी कॅम्पला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर प्रतिनिधी : सुनिल वाघमारे

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील पवित्र मतमाऊली यात्रेनिमित्त वंचित बहुजन युवाआघाडीच्या वतीने यात्रेकरू व भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या ऑनलाइन सदस्य नोंदणीसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता. अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ऑनलाइन सदस्यत्व स्वीकारत संघटनात्मक उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता हरेगाव येथे आयोजित ‘ख्रिस्ती हक्क परिषद’ व महासभेला वंचित बहुजन आघाडीचे युवानेते मा. सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मा. सुनिलजी वाघमारे व मा. सागरजी खरात यांनी भाविकांना केले.

या उपक्रमाला युवाप्रदेशाध्यक्ष मा. निलेशजी विश्वकर्मा, राज्याचे मा. ऋषिकेशजी नांगरेपाटील, राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, मा. विशालजी गवळी, युवाजिल्हाध्यक्ष मा. प्रविणजी आल्हाट आणि जिल्हाउपाध्यक्ष मा. सुहासजी राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हामहासचिव मा. सुनिलजी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मा. सागरभाऊ खरात यांनी केले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी VBA मीडिया टीमचे मा. विलास अहिरे, सचिन खरात, प्रसाद अमोलिक, आदित्य भालेराव, शुभम खरात, भावेश खरात, गौरव मोरे, प्रतिक तेलोरे, रोहित यादव, अतुल बारशे, विवेक रोहम, आशिष खरात, अनिल खंडागळे, असिर पठाण, अय्युब शेख, गणेश पठारे, विजय तेलोरे, विकी बांगरे, अजय खरात, सनी खरात आणि रितेश पठारे आदींनी सहकार्य केले.

सामाजिक सेवा आणि संघटनात्मक विस्ताराचा दुहेरी उद्देश साधणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!