पोलिस प्रशासन न्यूज.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संतोष पंडितराव वजुरकर यांचा हैदराबादमध्ये स्नेहदौरा


बीड (प्रतिनिधी): राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित व बीड जिल्ह्यात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य केलेले संतोष पंडितराव वजुरकर यांनी अलीकडे हैदराबाद येथे आप्तेष्टांच्या भेटीसाठी सपत्नीक स्नेहदौरा केला. नोकरीच्या धावपळीत आणि जबाबदाऱ्यांमुळे कौटुंबिक मित्रमंडळींना वेळ देणे शक्य झाले नव्हते. मात्र सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जुने ऋणानुबंध पुन्हा दृढ करण्याचा संकल्प केला आहे.

या स्नेहभेटीदरम्यान त्यांनी नातेवाईक, आणि जिवलग आप्तेष्टांच्या घरी जाऊन प्रेमळ संवाद साधला. अनेक वर्षांनी झालेल्या या भेटीगाठींमुळे दोन्ही बाजूंनी भावना अनावर झाल्या. काही ठिकाणी तर भेटीदरम्यान उर भरून आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

“नोकरीच्या काळात कर्तव्याला प्राधान्य देताना नाती जपण्यास वेळ मिळाला नाही; आता आयुष्याच्या या टप्प्यावर तीच नाती अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे वजुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

या दौऱ्यामुळे शिथिल झालेल्या नात्यांना नवसंजीवनी मिळाली असून आप्तेष्टांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत, परस्परांतील जिव्हाळा वाढवत सामाजिक ऋणानुबंध संघटना अधिक बळकट करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!