केज:
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेत, केज येथे रविवारी सायंकाळी ‘गुण गौरव पुरस्कार’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पत्रकार संघांचे संयुक्त आयोजन
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई), राष्ट्रीय पत्रकार संघ (केज), पुरोगामी पत्रकार संघ आणि सह्याद्री पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारितेसोबतच समाजकारण, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पुरस्कारार्थी आणि सन्मान
कार्यक्रमात मान्यवरांना फेटा बांधून, सन्मानचिन्ह आणि वृक्ष देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारार्थींची संक्षिप्त यादी खालीलप्रमाणे:
सीताताई बनसोड: उत्कृष्ट नगराध्यक्षा (केज न.प.)
डॉ. हारुणभाई इनामदार: केज भूषण गौरव पुरस्कार
डॉ. बाळासाहेब अस्वल: आदर्श डॉक्टर गौरव पुरस्कार
धनंजय कुलकर्णी: पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार
महादेव गायकवाड: पत्रकारिता संघर्ष गौरव पुरस्कार
हनुमंत भोसले सर: अष्टपैलू समाज गौरव पुरस्कार
राजुभाई इनामदार: उत्कृष्ट नगरसेवक गौरव पुरस्कार
दीपक कांबळे: पँथर भूषण गौरव पुरस्कार
विनोद गुंड:क्रिडा प्रशिक्षक गौरव पुरस्कार
प्रजेनजिन राहुल गायकवाड:उत्कृष्ट अभिनेता गौरव पुरस्कार
ज्योती विलास आरकडे:उत्कृष्ट अधिपदीचारीका गौरव पुरस्कार
संतोष गालफाडे: उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्कार
गौतम बचुटे: निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार
याव्यतिरिक्त क्रीडा, शिक्षण आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाने जिंकली मने
पुरस्कार सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे केज तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक गटातील मुला-मुलींनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. हनुमंत सौदागर, प्रा. पवन सरवदे आणि प्रा. विठ्ठल समुद्रे यांनी केले.
यशस्वी नियोजन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक अजय भांगे यांनी केले, तर सूत्रसंचालन हनुमंत भोसले सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकार संघांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला केज परिसरातील नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












