कोपरगाव (प्रतिनिधी):
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ‘श्रद्धेय’ ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलके येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करत ॲड. आंबेडकरांच्या नेतृत्वावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला.
युवा शक्तीचा निर्धार
युवा जिल्हाध्यक्ष मा. प्रविणभाऊ आल्हाट यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन शाखेचा नामफलक अनावरण सोहळा पार पडला. यावेळी शेकडो तरुणांनी ‘वंचित’ची धुरा आपल्या खांद्यावर घेत पक्षकार्यात झोकून देण्याचा निर्धार केला. तरुणांचा हा लक्षणीय सहभाग आणि त्यांचा उत्साह पाहून राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कोपरगाव तालुकाध्यक्ष प्रसादभाऊ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये राहता तालुका अध्यक्ष महेशभाऊ पाखरे, शिर्डी शहराध्यक्ष बाळाभाऊ गायकवाड, शिर्डी कार्याध्यक्ष मनीषभाऊ नारळे, सचिनभाऊ निकम यांच्यासह रॉबिन श्यामसुंदर काकडे, शिवाजी घुसळे, विलास पगारे, अशोक पगारे, संताराम मोरे, भाऊराव इंगळे, राजेंद्र साळवे, संदीपभाऊ धिवर, राहुलभाऊ ठोंबरे, रामभाऊ गोरे, संतोषभाऊ पगारे आणि राहुल पवार आदी उपस्थित होते. तसेच, युवा आघाडीचे जिल्हामहासचिव मा. सुनिलभाऊ वाघमारे यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
कार्यक्रमाच्या निमित्ताने दहेगाव बोलके शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली:
शाखाध्यक्ष: अविभाऊ पगारे
उपाध्यक्ष: विजय घुसळे
सचिव: दीपक पगारे
उपसचिव: अनिल पगारे
कार्याध्यक्ष: रोहन पगारे
उपकार्याध्यक्ष: सागर थोरात
संपर्कप्रमुख: आनंद आहेर
उपसंपर्कप्रमुख: दर्शन थोरात
संघटक: बाळासाहेब इंगळे
वंचितांच्या न्यायासाठी कटिबद्ध
“ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी आणि समाजातील वंचितांच्या न्यायासाठी ही युवा शाखा सदैव तत्पर आणि कटिबद्ध राहील,” असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या सोहळ्याला श्रद्धेय आंबेडकरांचे शेकडो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












