बीड:
जिल्ह्यातील कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही जलद गतीने पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मा. मंत्री, जलसंपदा (गोदावरी कृष्णा खोरे महामंडळ) तथा अध्यक्ष मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती यांच्या निर्देशानुसार हे शिबिर राबवले जात आहे.
जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत मंडळ स्तरावर हे शिबिर आयोजित करण्यात आले असून त्याचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
तालुकानिहाय शिबिर वेळापत्रक:
बीड:
११ सप्टेंबर: लिंबागणेश, येळंबघाट
१५ सप्टेंबर: बीड, चऱ्हाटा, कुर्ला, नाळवंडी, पिंपळनेर, पारगाव सिरस, मांजरसुंभा, घाटसावळी, पाली
१६ सप्टेंबर: पेंडगाव, राजुरी नं., नेकनूर, चौसाळा, म्हाळसजवळा
गेवराई:
१५ सप्टेंबर: उमापूर, धोंडराई, रेवकी, तलवाडा, गेवराई, माटेगाव, चकलंबा
१६ सप्टेंबर: पाडळसिंगी, कोळगाव, मादळमोही, पाचेगाव, जातेगाव, सिरसदेवी
शिरूर का.:
११ सप्टेंबर: शिरूर का., गोमाळवाडा
१५ सप्टेंबर: रायमोह, खालापुरी
१६ सप्टेंबर: तिंतरवणी, ब्र.येळंब
पाटोदा:
११ सप्टेंबर: थेरला
१२ सप्टेंबर: अंमळनेर
१५ सप्टेंबर: दासखेड, कुसळंब
१६ सप्टेंबर: पाटोदा
आष्टी:
११ सप्टेंबर: कडा, टाकळसिंग, धामणगाव
१२ सप्टेंबर: आष्टी ह.नां., पिंपळा, डोईठाण
१५ सप्टेंबर: आष्टी व दौलावडगाव
१६ सप्टेंबर: दादेगाव व धानोरा
माजलगाव:
१० सप्टेंबर: मंजरथ
११ सप्टेंबर: तालखेड व किट्टी आडगाव
१५ सप्टेंबर: गंगामसला व दिंद्रुड
१६ सप्टेंबर: नित्रुड
१७ सप्टेंबर: माजलगाव
धारूर:
१० सप्टेंबर: धारूर
११ सप्टेंबर: अंजनडोह
१५ सप्टेंबर: मोहखेड
१६ सप्टेंबर: तेलगाव
वडवणी:
११ सप्टेंबर: कवडगाव बु.
१५ सप्टेंबर: चिंचवण
१७ सप्टेंबर: वडवणी
अंबाजोगाई:
१० सप्टेंबर: अंबाजोगाई, घाटनांदूर
११ सप्टेंबर: बर्दापूर, राडी
१५ सप्टेंबर: उजनी, पाटोदा म.
१६ सप्टेंबर: लोखंडी सावरगाव
केज:
११ सप्टेंबर: केज व मसाजोग
१२ सप्टेंबर: ह.पिंप्री व नांदूरघाट
१५ सप्टेंबर: विडा व होळ
१६ सप्टेंबर: बनसरोळा, युसुफ वडगाव व चिंचोलीमाळी
परळी:
१५ सप्टेंबर: सिरसाळा, नागापूर, पिंपळगाव गाढे
१६ सप्टेंबर: मोहा, धर्मापुरी, परळी वै.
आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
पात्र नागरिकांनी संबंधित तारखेला मंडळ स्तरावरील शिबिरामध्ये आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात काही अडचण किंवा शंका असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन क्र. ०२४४२-२५२६९० वर संपर्क साधावा.










