धारूर/बीड: बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (VBA) बीड जिल्हाध्यक्ष (पश्चिम) अजय सरवदे उर्फ प्रतीक नवनाथ सरवदे यांना जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून कथितरित्या ‘टार्गेट’ केले जात असल्याचा आणि त्यांच्यावर MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या धारूर तालुका शाखेने उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन संबंधित मनुवादी प्रशासकीय अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे.जातीय दंगली भडकावणाऱ्यांविरोधात आवाज उठवल्याचा ‘राग’ निवेदनात नमूद केल्यानुसार, युवा नेते अजय सरवदे हे आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ते असून, त्यांनी वेळोवेळी समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात आणि सध्या बीड जिल्ह्यामध्ये जातीय दंगली भडकावण्याचा उद्देशाने भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या समाज कंटकांविरोधात कठोर भूमिका घेतली. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला धारेवर धरत न्यायाची भूमिका घेतली.याच भूमिकेचा राग मनात धरून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन ‘धर्माच्या ठेकेदाराला मोकाट सोडत’ असून, कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या सरवदे यांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर MPDA सारखे गंभीर आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.’कार्यकर्त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सहन करणार नाही'”कार्यकर्त्यांचे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न कराल, तर हे आंबेडकरी चळवळ व समाज कदापि सहन करणार नाही,” असा इशारा वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला दिला आहे. या गंभीर धमक्यांची दखल घेऊन, तत्काळ कारवाई करावी आणि धमक्या देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देताना इंजि. प्रशांत उघडे (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, धारूर) यांच्यासह तालुका महासचिव राणबा उजगरे, अभिजीत वाव्हळ, बाळासाहेब उजगरे, माने, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने चौकशी करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे













