ठाणे:
वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी, नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी तसेच माजी राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक ठाण्यातील येऊर हिल्स येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी राजकीय दिशा आणि संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला पक्षाच्या मागील राज्य कार्यकारिणीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ध्येय-धोरण ठरवणे, जनसंपर्क वाढवणे आणि राज्यभरात संघटना मजबूत करणे यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी विचारमंथन केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारिणी महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे, प्रा. अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रियदर्शी तेलंग, माजी आमदार नतिकुद्दीन खतीब, अशोक सोनोने, प्रा. किसन चव्हाण, अरुंधती शिरसाठ, राहुल गायकवाड, सविता मुंडे, डॉ. क्रांती सावंत, दिशा पिंकी शेख, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ. अरुण जाधव, दीपक डोके, जितरत्न पटाईत, सर्वजीत बनसोडे, उत्तम वनशिव, सारंग थोरात, डॉ. चित्रा कुऱ्हे, सिद्धार्थ मोकळे, प्रशांत इंगोले, कृष्णा देशमुख, ज्ञानेश्वर कवठेकर, अनिल जाधव, फारुख अहमद, गोविंद दळवी, कुशल मेश्राम आणि अमित भुईगळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












