पोलिस प्रशासन न्यूज.

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलमधील रखडलेल्या घरकुलांसाठी अभियंत्याची नियुक्ती


जालना : प्रतिनिधी तालुक्यातील सेवली सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील घरकुलांचे हप्ते गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नसल्यामुळे लाभार्थ्यांना या अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र, या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, प्रशासनाकडून आता या सर्कलसाठी स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

​काय आहे प्रकरण? सेवली सर्कलमधील शेकडो लाभार्थ्यांची घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींना पुढील हप्ते मिळणे बाकी आहे. या कामांचे तांत्रिक मूल्यमापन आणि प्रगती अहवाल सादर करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचे हप्ते जमा होण्यास विलंब होत होता. यामुळे घरकुलांची कामे खोळंबली होती.

​प्रशासनाकडून आदेश निर्गमित या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डाके यांनी ४ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती जालना येथे लेखी अर्ज देऊन अभियंता नियुक्त करण्याची मागणी केली होती. या अर्जाची दखल घेत जालना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) दि. १६ मार्च २०२६ पासून श्री. हसीब मुजीब खाजा यांची ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून सेवली सर्कलसाठी नियुक्ती केली आहे.

​या नियुक्तीमुळे आता सेवली सर्कल मधील प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या कामांना वेग येणार असून, प्रलंबित हप्ते लवकरच बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!