पोलिस प्रशासन न्यूज.

“भीमा तुझ्या जन्मामुळे ” ज्यांच्या जीवनात नवीन पहाट उगवली, त्यांची भीम जयंती उत्साहात विविध उपक्रमाने साजरी


बीड प्रतिनिधी – ज्यांच्या जन्मामुळे कोट्यावधी लोकांचे जीवन उजळून गेले व त्यांच्या जीवनात नवीन पहाट उगवली, ज्या महामानवाने आपल्या अतिउच्च शिक्षणाचा उपयोग दिन, दलित, वंचित, समस्त स्त्रिया व संपूर्ण मानव जातीच्या कल्याणा करता केला. त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बीड शहरात दि.५ एप्रिल २०२६ पासून जयंती दिन १४ एप्रिल पर्यंत दिवसभर विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी असूनही शिस्तबद्ध रित्या अभिवादन करण्यात येत होते. तीव्रतेची तमान बाळगता अनेक सामाजिक संस्थांनी, थंड पाणी, थंडपेय नाष्ट्या करिता खिचडी केली व दान करून दान पारमितीचे पालन केले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक प्रेम सर्वज्ञात आहे. त्यांच्या विचाराचे एक तरी पुस्तक दान द्यावे या हेतूने प्रज्ञासूर्याला अभिवादन करून काही ग्रंथप्रेमी संस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पुस्तके दान करण्यात आली. त्यामध्ये राजश्री शाहू महाराज विद्यार्थी विकास कार्यक्रम अंतर्गत पुस्तक भेट अभिनव कार्यक्रम राबविण्यात आला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची पुस्तके दान दिली. इन्हिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक मोफत वितरित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचार प्रवर्तक व उद्बोधक लेख असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रचा विशेषांक दैनिक जननेत्याचा वितरित करण्यात आला. तसेच दैनिक प्रवक्ता लोकशाही या विशेष अंकाचे वाटप करून घराघरापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य व स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय मिळवण्याकरिता. केलेल्या महान कार्याची , सर्वांना माहिती वाचाल तर वाचाल तर्फे वाटप करून लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचाल तर वाचाल या अनमोल उपदेशाची आठवण करून दिली दैनिक प्रवक्ता लोकशाहीचा अंक वाटपा करिता महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, करण वाघमारे, व अँड.. तेजस वडमारे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!