पोलिस प्रशासन न्यूज.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर


केज/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,अंबाजोगाई हे कार्यालय आता स्वतःच्या मालकीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे.

लातूर–छत्रपती संभाजी नगर महामार्गालगत,स्व. विमलताई मुंदडा आरोग्य संकुल शेजारी मौजे लोखंडी सावरगाव येथे बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालयीन इमारतीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे सर्व कामकाज दि.६ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहे.

त्यामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स),परवाने,कर भरणा तसेच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी नागरिकांनी यापुढे आता लोखंडीसावरगाव येथील नवीन कार्यालयात उपस्थित राहून आपली कामे करून घ्यावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,अंबाजोगाई यांनी केले आहे.नवीन कार्यालयीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून कामकाज अधिक सुलभ व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.नागरिकांनी याची नोंद घेऊन पुढील सर्व कामकाजासाठी लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयाचा उपयोग करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!