पोलिस प्रशासन न्यूज.

*राज्य शासनाने सेवली येथे अतिरिक्त तहसील कार्यालयास मंजुरी न दिल्यास वंचितचे आक्रमक आंदोलन*


जालना.(रामकिसन अवधूत)प्रतिनिधी : तहसील व महसूलची शासकीय कामे करण्यासाठी जालना ते सेवली ६५ कि.मी. पेक्षा जास्त अंतर आहे म्हणून सेवली व परीसरातील नागरिकांची रोज होत असलेली गैरसोय होऊ नये म्हणून सेवली येथे शासनाने अतिरिक्त तहसील कार्यालयची मंजुरी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरील मागणी मान्य न झाल्यास दिनांक १० मार्च २०२६ रोजी सेवली येथे वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्याचा येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी दिला आहे या निवेदनावर , शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) जालना तालुकाध्यक्ष गणेश दराडे, प्रल्हाद पालवे दिलीप मगर, मुकुंद काळे, गौतम वाघमारे, विठ्ठल खाडे, दत्ता खाडे, शहाजी खाडे, शत्रुघ्न कोळी, बबन खाडे, रूस्तुम तुरेराव, रोशन सदावर्ते करण काळे दिपक काकडे,नंदु बच्छीरे,दिपक उघडे, संतोष मगर, अर्जुन घुगे, भिवाजी मगर,योगेश उघडे, विश्वनाथ मगर, भिमराव घुगे, प्रकाश प्रधान केरुबा घुगे सुनील उघडे संम्यक डोके, संकेत उघडे बाबासाहेब उघडे यांच्या सह स्वाक्षऱ्या आहेत.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!