पोलिस प्रशासन न्यूज.

साने गुरुजी निवासी विद्यालय हे केज तालुक्यातील उत्तम शिक्षण देणारे संकुल म्हणून नावलौकिक प्राप्त-प्रा.हनुमंत भोसले


केज/प्रतिनिधी

साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय केज येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात मार्गदर्शन करताना प्रा.हनुमंत भोसले सर यांनी सांगितले की,आपले करिअर यशस्वी करण्या साठी आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम हा मौज मजेचा नसुन आपल्या भविष्याचा विचार करण्याचा आहे. दहावी नंतर आपण आपल्या ख-या करिअर सुरवात करण्यासाठीचा आहे.विद्यार्थी मित्रानो

तुमच्या कार्याने मोठे व्हा एका क्षेत्रात प्रगती करा प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात असते परिश्रम करणारा विद्यार्थी हा यशस्वी होतोच यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे नियोजित वेळापत्रक करुन अभ्यासाचा नियोजन करावे जगात आफाट अशा संधी असुन अचुक संधी शोधून संधीचा उपयोग कसा घेतो यावर अवलंबून आहे.मानव सेवा हीच ईश्वर सेवा असुन जगात एकच ईश्वर आहे ते म्हणजे आपले आई आणि वडील आहे.त्यांची प्रेरणा घेऊन वाटचाल केल्यास आपण कुठेच कमी पडणार नाही आणि आई वडील आणि गुरुजींना आपल्या जीवनातील खरे मार्गदर्शक म्हणून मान दिले पाहिजे गुरु हा आपल्या शिष्यांचा कधीच वाईट होईल असे मार्गदर्शन करत नाहीत गुरुजनांना आपला विद्यार्थी नेहमीचयशाच्या शिखरावर असावा असे वाटते.साने गुरुजी निवासी विद्यालय केज च्या संकुलात चांगल्या प्रकारे गुणवत्ता पुर्वक शिक्षण दिले जाते या संकुलात इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे केंद्र असून या केंद्रात भयमुक्त वातावरणात परिक्षा पार पडतात याचा मला स्वतःला चांगला अनुभव आहे असे मार्गदर्शन पर मत व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर बीडजिल्हा ऊसतोड कामगारविकास मंडळ केजच्या संस्थेचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड,उपाध्यक्ष श्री. राजेश कापसे व या संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता गित्ते कराड मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!