पोलिस प्रशासन न्यूज.

साबला येथे २३ जानेवारीला आजी-माजी सैनिकांचा सन्मान सोहळा ​माजी सैनिक कै. आश्रुबा काकडे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन;


केज/प्रतिनिधी: भास्करराव पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती. केज तालुक्यातील साबला येथे माजी सैनिक कै. आश्रुबा चंद्रभान काकडे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून आजी-माजी सैनिकांच्या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

​देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या उद्देशाने काकडे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदर्श सरपंच तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मार्गदर्शक श्री. भास्करराव पेरे पाटील यांची उपस्थिती लाभणार असून, त्यांचे बहुमोल मार्गदर्शन उपस्थितांना मिळणार आहे.

​या सोहळ्यात केज तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या त्याग आणि शौर्याचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​सदर कार्यक्रमाचे आयोजन कै. आश्रुबा काकडे यांचे चिरंजीव श्री. विलास आश्रुबा काकडे, श्री. दत्तकुमार आश्रुबा काकडे व समस्त काकडे परिवाराने केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साबला ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या प्रेरणादायी सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काकडे परिवार व साबला ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!