पोलिस प्रशासन न्यूज.

रेल्वे कामाला गती देण्यासाठी खा.बजरंग सोनवणे घेणार आढावा बैठक,विविध विभागाचे अधिकारी राहणार उपस्थित


केज/प्रतिनिधी :अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गातील कामाला गती मिळावी,प्रलंबित प्रश्न वेळेत सुटावेत आणि बीडकरांना लवकर रेल्वे प्रवासाचा लाभ व्हावा यासाठी खा.बजरंग सोनवणे प्रयत्न करत आहेत.दि.२४ जानेवारी रोजी रेल्वेच्या कामांचा ते आढावा घेणार आहेत. आयोजीत आढावा बैठकी ला विविध विभागाचे प्रमूख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील प्रलंबित प्रश्न,रखडलेली विकास कामे तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत खा.बजरंग सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली शनिवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत समस्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. रेल्वे गाड्यांचे थांबे, वेळापत्रकातील अडचणी, प्रवासी सुविधांचा अभाव, स्थानकांवरील स्वच्छता, प्रकाशयोजना,सुरक्षितता तसेच अपूर्ण विकासकामे हे प्रमुख मुद्दे बैठकीच्या अजेंड्यावर आहेत.बीड- परळी रेल्वे मार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत.याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी,विकास कामांना गती द्यावी तसेच प्रवासी सेवा अधिक सक्षम करावी,याबाबत चर्चा होणार आहे. खासदारांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.रेल्वे ही सामान्य जनतेची महत्त्वाची वाहतूक सेवा आहे.त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी दूर करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे अशी भूमिका खा. बजरंग सोनवणे यांची आहे.या बैठकीतून बीड जिल्ह्यातील रेल्वे सुविधा बाबत सकारात्मक निर्णय होतील,रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!