पोलिस प्रशासन न्यूज.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी रंजित घाडगे; केज तालुकाध्यक्षपदी दिनकर जाधव यांची निवड


केज: (प्रतिनिधी)

“जय भारत” हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रसह संपूर्ण देशात गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार आणि पीडित, शोषित, वंचित घटकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत)’ या संघटनेची बीड जिल्हा आणि केज तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये बीड जिल्हाध्यक्षपदी रंजित घाडगे यांची फेरनिवड, तर केज तालुकाध्यक्षपदी दिनकर जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

​संस्थापक अध्यक्ष तथा संपादक विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये, सोमवार (दि. १५ जाने.) रोजी केज येथील शासकीय विश्रामगृहात कोअर कमिटी सदस्य दत्तात्रय मुजमुले आणि रंजित घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा करून नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.

​जिल्हा व तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

बीड जिल्हा कार्यकारिणीत रंजित घाडगे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. त्यांच्यासोबत जिल्हा सचिव पदी अनिल वैरागे आणि जिल्हा उपाध्यक्ष पदी सुग्रीव क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.

​केज तालुका कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून दिनकर जाधव यांची निवड झाली असून, इतर पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत:

​सचिव: सचिन भालेराव

​कोषाध्यक्ष: मनोराम पवार

​उपाध्यक्ष: जयद्रथ गायकवाड व किशोर गरुड

​सहसचिव: जयपाल रोकडे

​या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पत्रकारांच्या संरक्षणासाठी ही नूतन कार्यकारिणी तत्परतेने काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!