पोलिस प्रशासन न्यूज.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची कुक्कडगाव येथे ३०१ वी जयंती उत्साहात साजरी


बीड | प्रतिनिधी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त कुक्कडगाव (ता. बीड) येथे रविवारी, दि. ३१ मे २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिजाऊ चौक, माऊली नगर चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या तीन ठिकाणी ध्वजारोहण करून राजमातांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी कुक्कडगावसह चव्हाणवाडी, खुंड्रस व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या समाजहितैषी, लोककल्याणकारी आणि आदर्श शासन व्यवस्थेच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात एकता, सेवा आणि विकासाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

 

जयंती कार्यक्रमास यशवंत भाऊ कदम, कॅप्टन राजाभाऊ आठवले, दादासाहेब गांडगे, आत्माराम प्रभाळे, चंद्रकांत नवले, डॉ. मयूर कदम, महादेव गांडगे, रामेश्वर खंडागळे, ईश्वर खंडागळे, भागवत गांडगे, लक्ष्मण चौरे, प्रल्हाद निर्मळ, श्रीराम गुरव, भगवान खंडागळे, नंदलाल नवले, तुळशीदास (भाऊ) पवार, महेंद्र (भाऊ) कुटे, संतोष बचाटे, योगेश नवले, अजय आठवले, अभिमान हटवटे, सुभाष शिंदे, पप्पू लाड, महादेवराव आठवले, परमेश्वर खंडागळे, अर्जुन नवले, गणेश गाडे, दीपक जाधव, श्रीराम खंडागळे, सत्यभान खंडागळे, कल्याण शिंदे, कृष्णा कुटे, संजय आठवले, भास्कर आठवले, सुखदेव शिंदे, बापूसाहेब शिंदे, महेश साळवे, मदन कुंभारकर, आण्णासाहेब, ऋषिकेश मस्के, प्रदीप शिंदे, अनिल चक्रे, प्रभाकर कुटे, सुनील महाराज पठाडे, नामदेव मुकदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून, जयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ग्रामस्थांनी त्यांच्या आदर्श कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!