पोलिस प्रशासन न्यूज.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेवली येथे वंचित बहुजन आघाडीकडून विनम्र अभिवादन!


जालना. प्रतिनीधी. (रामकिसन अवधूत) : प्रजेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त जालना जिल्ह्यातील सेवली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या महान जीवनकार्याला आणि लोककल्याणकारी विचारांना उजाळा दिला.

जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश खरात, खांबेवाडी/नागपूर ग्रामपंचायतीचे सरपंच रामदास सदावर्ते हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य केवळ एका काळापुरते मर्यादित नसून, त्यांचे कुशल प्रशासन, न्यायव्यवस्था आणि समाजकल्याण आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या अभिवादन कार्यक्रमास गणेश उबाळे, दिलीप बिबे, सुखदेव जैवळ, शत्रुघ्न कोळी, प्रल्हाद पालवे, मुकुंद काळे, गौतम मगर, अर्जुन घुगे, अरुण काकडे, रवी बिबे, अमोल हजारे, राहुल सदावर्ते (ग्रामपंचायत सदस्य, ढगी) आणि बबन खाडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!