परळी वैजनाथ / प्रतिनिधी
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) च्या परळी वैजनाथ शाखेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून नगरपरिषदेकडील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन देण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. नगरपालिकेचे नगाराध्यक्ष मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत कामगारांचे थकीत वेतन अदा केले.
कंत्राटी कामगारांना दीर्घकाळापासून वेतन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत RMBKSच्या पदाधिकाऱ्यांनी एकजूट दाखवत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष विक्रांत सूर्यकांत समींदरसवळे, कार्यकारी अध्यक्ष बालाजी मारोती गजबे, महासचिव अविनाश वसंतराव गायकवाड, उपाध्यक्ष अमोल अर्जुन मस्के, सचिव सुमेर सूर्यकांत समींदरसवळे, कोषाध्यक्ष संध्या भैय्यासाहेब जगतकर तसेच लता पंडित इंगळे, सुनील माणिकराव जगतकर, कैलास हरिभाऊ उपाडे, भैय्यासाहेब शिवाजीराव जगतकर, अतुल अनिल चौरे, सुभाष आदी सदस्यांनी पुढाकार घेतला होता.
संघटना स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मोठ्या मागणीला यश मिळाल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचे आभार मानले आहेत. तसेच पुढील काळातही कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.












