पोलिस प्रशासन न्यूज.

ओबीसी आरक्षणा संदर्भात संभाजीनगर येथे ओबीसी-भटके विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मार्गदर्शन


संभाजीनगर(औरंगाबाद): मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी (इतर मागास वर्ग) आणि भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत असताना, या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आज दिनांक.१०/१०/२०२५/वार शुक्रवार रोजी संभाजीनगर (औरंगाबाद )येथे ओबीसी, भटके विमुक्त महासंघाची एक महत्त्वपूर्ण राज्यव्यापी बैठक संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला विशेष उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. सध्याच्या राजकीय आणि आरक्षणाच्या स्थितीवर त्यांनी आपले मत व्यक्त करून समाजाला पुढील दिशा दिली.​या बैठकीत राज्यभरातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाचे निमंत्रक प्रा. किसन चव्हाण, धनगर नेते प्रभाकर बलके, ओबीसी नेते अशोक जाधव धनगावकर आणि महेश निनाळे यांचा समावेश होता. मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींमुळे आपल्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. याच दृष्टीने या बैठकीत ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनीती निश्चित करण्यात आली आहे.समाजाने आता संघटित राहून आपल्या मागणीसाठी लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन या बैठकीत उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!