पोलिस प्रशासन न्यूज.

​🛑 LIVE ASHOK TIMES: ‘नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?’ श्रीरामपूर तहसीलवर वंचितची धडक; गॅस तुटवड्यावरून सरकारचा निषेध


श्रीरामपूर,सुनील वाघमारे(प्रतिनिधी):

देशभरात निर्माण झालेला घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा आणि केंद्र सरकारच्या कथित चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?’ असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

​📍 राज्यव्यापी आंदोलनाचा भाग

​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात गॅस टंचाईविरोधात आंदोलने होत आहेत. याच साखळीचा भाग म्हणून श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष डॉ. गौतम चित्ते यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

​🎙️ मोदी सरकारच्या ‘आर्थिक नीती’वर प्रहार

​यावेळी बोलताना आंदोलकांनी केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशात गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, महिलांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅसचा काळाबाजार फोफावला असून गरिबांचे बजेट कोलमडले असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

​”पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणांमुळे आज गृहिणींना चुलीकडे वळावे लागत आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू,” असा इशारा डॉ. गौतम चित्ते यांनी दिला.

​👥 आंदोलनातील प्रमुख उपस्थिती

​या आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सुनील वाघमारे यांनी मार्गदर्शन केले, तर ॲड. अमोल सोनवणे यांनी सरकारला खड्या आवाजात जाब विचारला. निवेदनावर खालील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत:

​वैशालताई अहिरे (जिल्हाध्यक्षा, भारतीय बौद्ध महासभा)

​ॲड. अण्णासाहेब मोहन (तालुका महासचिव)

​विशाल पठारे (ग्रा.पं. सदस्य, दत्तनगर)

​ओम त्रिभुवन, संतोष त्रिभुवन, योगेश घोडके, अविनाश गोरे, अजय चिनोरिया, शब्बीर शेख, चांदभाई शेख, राम दाने, महेश भालेराव व अन्य.

​👩‍🦰 महिलांचा रणरागिणी अवतार

​आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांची मोठी उपस्थिती. लीलाबाई त्रिभुवन, अश्विनी अहिरे, मंदा लहाने, झूबरबाई बोर्डे, सुशीला जाधव, राजश्री त्रिभुवन, रेखा दाने, मीना थोरात, अलका भालेराव, रेणुका मोरे, कडुबाई सोनवणे आणि शाहनाज शेख यांच्यासह अनेक महिलांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!