पोलिस प्रशासन न्यूज.

घुंगर्डे हादगाव येथे शेतकऱ्यांचा एल्गार; 8 एप्रिलपासून बेमुदत उपोषण


सुखापूरी.रामकिसन अवधूत (प्रतिनिधी)

रुई – घुंगर्डे हादगाव पांदण रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नावरून शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, दि. 8 एप्रिलपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर काल रात्री शेतकऱ्यांनी गावातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणी उपोषणासंदर्भातील बॅनर लावून आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून आले. गावात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित पांदण रस्त्यासाठी शेतकरी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येत उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून, “रस्ता झालाच पाहिजे” या ठाम भूमिकेतून आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या उपोषणात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!