पोलिस प्रशासन न्यूज.

कोपरगावात वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न;


 

अहमदनगर | प्रतिनिधी : सुनिल वाघमारे

दि.२ जुलै रोजी कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसंवाद मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन कोपरगाव तालुक्यातील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमामुळे कोपरगाव तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ झाल्याचे चित्र नक्कीच पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाच्या राज्य प्रवक्त्या तथा फायरब्रँड नेत्या उत्कर्षाताई रुपवते या होत्या. यावेळी उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मा. संतोषजी चोळके, जिल्हा महासचिव मा. मधुकर साळवे, युवा आघाडीचे जिल्हा महासचिव मा. सुनिल वाघमारे, vba जिल्हा संघटक मा. दीपक कसबे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष डॉ. गौतम चित्ते, युवा जिल्हा उपाध्यक्ष मा. बबलुभाऊ पगारे तसेच संजय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे आयोजन मा. प्रकाशजी दुशिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमात बाबासाहेब कोपरे, देविदास गायकवाड, संतोष कोपरे, मारुती कोपरे, सुनील कोपरे, संदीप दुशिंग, आकाश दुशिंग, हेमंत कोपरे, किशोर दुशिंग, आनंद कोपरे, आदित्य गायकवाड, कृष्णा गायकवाड, विकास दुशिंग, सुनील दुशिंग, दीपक कोपरे, प्रमोद कोपरे, सागर कोपरे, रमेश कोपरे, अजय कोपरे, किरण दुशिंग, अमोल थोरात, रमेश दुशिंग, दादू गायकवाड, सुशील कोपरे, बाळू कोपरे, एकनाथ कोपरे, लक्ष्मण कोपरे, सिद्धार्थ कोपरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाची ध्येय-धोरणे, श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची विचारधारा, सामाजिक न्यायाची भूमिका तसेच राज्याच्या राजकारणात पक्षाचे वाढते महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही मान्यवरांनी केले.

तसेच पक्षाच्या बळकटीसाठी प्रत्येक पुरुष, महिला, व युवकांनी वंचित बहुजन आघाडीचे ऑनलाईन सदस्य झाले पाहिजे असे आव्हान सुनिल वाघमारे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. प्रकाश दुशिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच सर्व उपस्थितांना खीरदान करण्यात आले. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामुळे कोपरगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे संघटन अधिक बळकट झाल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले.


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!