केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आंधळेवाडी येथील काशीबाई विष्णू आंधळे ह्या शुक्रवार दि.८ मे रोजी केज बसस्थानका मधून केज पिराचीवाडी या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून ५४ हजार रुपयांच्या दागिन्याची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील आंधळ्यांचीवाडी येथील काशीबाई विष्णू आंधळे या काही कामानिमित्त केज येथे आल्या होत्या. गावाकडे परत जात असताना शुक्रवार दि. ८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान केज पिराचीवाडी ही बस लागल्यामुळे त्या बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन खोलून पर्समध्ये ठेवलेले सहा ग्रॅमचे सोन्याचे मनी, मंगळसूत्र,तीन ग्राम सोन्याचे झुंबर जोड, चांदीचे वाळे जोड, चांदीचे कडे जोड आणि घुंगराचे वाळे जोड असा एकूण ५४ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी काशीबाई विष्णू आंधळे यांनी दिलेले फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात सोमवार दि. ११ मे रोजी दुपारी २ वाजता गुन्हा नोंद झाला असून सहाय्यक फौजदार राजू वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.














